Home Page Image
   
     
 
 

 

‘जलयुक्त शिवार’ अभियानाचे काही प्रमुख उद्देश…

  • पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.
  • भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे.
  • राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे.
  • भूजल अधिनियमाची अंमलबजावणी.
  • विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे.
  • पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
  • अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे.
  • जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे.
  • पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.