बंद

उप अधीक्षक भूमि अभिलेख साकोली

तालुका मुख्यालयाची माहिती
तालुका मुख्यालयाचे ठिकाण साकोली
जिल्हा भंडारा
राज्य महाराष्ट्र
नागपूरच्या पूर्वेस 100 किमी अंतरावर, भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 42 किमी अंतरावर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वसलेले हे शहर भंडारा जिल्ह्यातील एकूण सात तालुक्यांपैकी सर्वात जुना तालुका आहे. या तालुक्याची स्थापना 1 मे 1905 रोजी झाली आहे. साकोली-शेंदुरवाफा नगरपंचायतीची स्थापना सन 2016 मध्ये झाली असून, नगरपंचायतीमार्फत शहरातील प्रशासकीय कामकाज पार पाडले जाते. नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे शहराच्या उत्तरेस 22 किमी अंतरावर आहे.
विधानसभा मतदारसंघ साकोली
लोकसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया
पिनकोड ४४१८०२
शहराची लोकसंख्या २४८९० (२०११ च्या जणगणनेनुसार)
तालुक्याची लोकसंख्या १३६८७९ (२०११ च्या जणगणनेनुसार)
एकूण महसुली गावे ९६
प्रचलित पुनर्मोजणी योजनेची गावे ९४
प्रचलित एकत्रीकरण योजनेची गावे २ (सेंदूरवाफा व मालूटोला)
तालुक्याचे क्षेत्रफळ ६२४ चौ. किमी.
शहराचे क्षेत्रफळ (नगरपरिषद हद्द) १३.८८ चौ. किमी.
अक्षांश (Latitude) २१.०८° N
रेखांश (Longitude)  ७९.९८° E

आमच्या विषयी 

 

7 कलमी कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भूमि अभिलेख विभागाचे समाधान शिबीर.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील दि 13/1/2025 च्या शासन निर्णयानुसार
1) सुकर जीवनमान व
2) जनतेच्या तक्रारीचे निवारण
या दोन महत्वाच्या मुद्द्याबाबत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भूमि अभिलेख विभागाचे समाधान शिबीर राबविले जात आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रतिदिन दोन कर्मचारी जाऊन लोकांना भूमि अभिलेख विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नियमित  योजणांची व नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती लोकांना दिली जाते.
वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, यांना सुद्धा सदर शिबिरामध्ये सहभागी करून जनतेला माहिती पुरविली जाते. आजपर्यंत साकोली तालुक्यातील जवळपास 50 ग्रामपंचायत मध्ये सदर चा उपक्रम यशस्वी करण्यात आलेला असून शेकडो लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे.
भूमि अभिलेख विभाग लोकांना अनुकूल करण्याचे उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आलेला आहे.
या उपक्रमात स्वामित्व योजना, मोजणीची कार्यपद्धती, फेरफार कार्यपद्धती, अभिलेख दुरुस्ती, भूमि अभिलेख विभागाच्या विविध ऑनलाईन सेवा, इत्यादी बाबतीत लोकांना माहिती देऊन भूमि अभिलेख खात्याबाबत त्यांच्यात जाणीव – जागृती निर्माण केली जाते.

माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम ४(१) नुसार स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची माहिती

उप अधीक्षक भूमि अभिलेख साकोली कार्यालयातील माहिती अधिकार अधिनियम – २००५ मधील तरतूदीनुसार पदनिर्देशित अधिकारी व कालमर्यादा

माहिती अधिकार अधिनियम – २००५ मधील तरतूदीनुसार पदनिर्देशित अधिकारी
१) जन माहिती अधिकारी श्री ए. के. फटिंग (शिरस्तेदार)
२) प्रथम अपीलीय अधिकारी श्री अनिल मायावती रतिराम फुलझेले
उप अधीक्षक भूमि अभिलेख, साकोली
३) द्वितीय अपीलीय अधिकारी मा. श्री भूपेंद्र गुरव
राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ, नागपूर
पत्ता – प्रशासकीय इमारत क्रमांक २ सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१
माहिती अधिकार अधिनियम – २००५ मधील तरतूदीनुसार कालमर्यादा
अ. क्र.  जन माहिती अधिकारी यांचेकडून माहिती मिळण्याच्या कालावधी प्रथम अपील अर्ज दाखल करण्याचा कालावधी प्रथम अपिलाचा निर्णय देण्याच्या कालावधी द्वितीय अपील दाखल करण्याचा कालावधी द्वितीय अपिलाचा निर्णय देण्याचा कालावधी
१. ३० दिवस ३० दिवस    ३० दिवस किंवा जास्तीत जास्त ४५ दिवस ९० दिवस   ……..

सेवा हमी कायदा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५
मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील अधिसूचना क्र. भू-३/ वि.नों.क्र. २०५/म.लो.ह.अ.२०१५, दिनांक ०४/०८/२०१६ नुसार –

नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियत कालमर्यादा व पदनिर्देशित अधिकारी 
अ.क्र. लोकसेवेचा तपशील विहित कालमर्यादा पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे पदनाम प्रथम अपिलीय अधिकारी दिव्तीय अपिलीय अधिकारी
१. नक्कल पुरविणे
अ) आखीव पत्रिका ३ दिवस मुख्यालय सहाय्यक / परिरक्षण भूमापक (गावठाण) उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
ब) टिपण, क्षेत्रबुक, प्रतिबुक, शेतपुस्तक, जबाब, फाळणी, काटे फाळणी, स्कीम उतारा, हिस्सा फॉर्म नं. ४, आकार फोड, आकारबंद, गट नकाशा, मोजणी नकाशा, कमी-जास्त पत्रक, चौकशी नोंदवही इत्यादी अभिलेख. ५ दिवस मुख्यालय सहाय्यक उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
क) अपील निर्णयाच्या नकला ३ दिवस मुख्यालय सहाय्यक उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख
२. मोजणी प्रकरणे
 
अ) मोजणीची कार्यवाही पूर्ण करणे –
 
I) अतिताताडी प्रकरणे ६० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
II) तातडी प्रकरणे ९० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
III) साधी प्रकरणे १८० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
IV) अति अति तातडी १५ दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
·         दुरुस्ती अधि सुचना क्र. ३ दिनांक १०/०५/२०१८ जमाबंदी कार्यालय अन्वये
ब) मोजणी पूर्ण झालेनंतर मोजणी नकाशाची क प्रत देणे. १५ दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
३. आकारफोड / क.जा.प. तयार करणे.
अ) पोटहिस्सा मोजणीनंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये आकार फोड मंजूर करणे. ३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
ब) बिनशेती मोजणी प्रकरण निकाली झाल्यानंतर परिपूर्ण प्रकरणामध्ये कमी-जास्त पत्रक तयार करून मंजूर करणे. ३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
४. फेरफार नोंदी
 
अ) विवादग्रस्त नसल्यास २५ दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
ब) दुवा तुटलेली असल्यास फेरफाराबाबत निर्णय घेणे. ९० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
क) रस्ता, रस्ता सेट बँक, रिझर्वेशन याबाबत संबंधित प्राधिकरणाला जागा हस्तांतरित केलेल्या प्रकरणी संबंधितांच्या नांवे मिळकत पत्रिकेत नोंद घेणे (प्रकरणी महानगरपालिका / सक्षम प्राधिकारी यांनी ताबा पावती व संपूर्ण कागदपत्रासह नामांतरासाठी प्रकरण पाठविल्यास) ३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
ड) विवादग्रस्त असल्यास १ वर्ष उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
५. मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करून मिळकत पत्रिका स्वतंत्र करणे.
 
याबाबत पोटहिस्सा मोजणी पूर्ण झालेल्या दिवसापासून
अ) जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केलेल्या क्षेत्रात तफावत येत नसल्यास पोटहिस्सा मोजणी झाल्यापासून स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.
३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
ब) जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केलेल्या पोटहिस्सा क्षेत्रात तफावत येत आहे. मात्र मूळ नगर भूमापनाच्या क्षेत्रात फरक नाही अशा प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी फेरमान्यता दिल्यानंतर स्वतंत्र मिळकत पत्रिका उघडणे. १५ दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
६. भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बँक, रिझर्वेशन याबाबत शासन / संबधित प्राधिकारी यांचे नांवे स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे.
 
अ) ज्याठिकाणी मूळ नगर भूमापनाच्या क्षेत्रात फरक पडत नाही अशा बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्यांचा अंतिम आदेश झालेनंतर मिळकत पत्रिका स्वतंत्र तयार करणे. ३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
ब) हस्तांतरण क्षेत्रात फरक पडत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या फेरअंतिम आदेशानंतर ३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
७. दुरुस्तीसह अद्यावत नकाशा पुरविणे (पोटहिस्सा, सामीलीकरण, भूसंपादन, रस्ता सेट बँक इत्यादीमुळे नकाशात होणारे बदल)
दुरुस्तीसह अद्यावत नकाशा तयार करणेबाबत (पोटहिस्सा, सामीलीकरण, भूसंपादन, रस्ता सेट बँक इत्यादीमुळे नकाशात होणारे बदल) सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीने अंतिम आदेश दिल्यानंतर. ३० दिवस उप अधीक्षक भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपसंचालक भूमि अभिलेख
·         दुरुस्ती अधि सुचना क्र. २ दिनांक २३/०४/२०१८ जमाबंदी कार्यालय अन्वये.

 

विशाखा समिती

उप अधीक्षक भूमि अभिलेख, साकोली जिल्हा – भंडारा
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम- २०१३ अन्वये-
अंतर्गत तक्रार निवारण समिती – (विशाखा समिती)

विशाखा समिती
अ. क्र नाव व पदनाम अध्यक्ष/सदस्य 
श्रीमती कविता ता. आकरे (अभिलेखापाल) अध्यक्ष
श्री अवधेश के. फटिंग (शिरस्तेदार) सदस्य
कु. प्रणाली यो. तागडे (शिपाई) सदस्य/सचिव
श्री प्रमोद के. जिभकाटे (परिरक्षण भूमापक) सदस्य
सौ. मंगला उदाराम मेश्राम (वकील) अशासकीय सदस्य

 

“स्वामित्व योजना – माहिती पुस्तिका”

जिल्हाधिकारी भंडारा यांचे संकल्पनेतून ” स्वामित्व योजना – माहिती पुस्तिका ” (Drone Survey Manual ) तयार करण्यात आलेले आहे.
सदर माहिती पुस्तिकामध्ये स्वामित्व योजनेची संपूर्ण कार्यपद्धती व योजने संबंधाने असलेल्या कायदेशीर तरतुदी, नियम आणि आजपर्यंत शासनाने व मा जमाबंदी आयुक्त यांनी वेळोवेळी काढलेले सर्व शासन निर्णय,परिपत्रके यामध्ये दिलेले आहेत.
सदर पुस्तिकेमुळे स्वामित्व योजनेचा सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामीण भागातील लाभार्थी नागरिक यांचेपर्यंत योग्य प्रचार प्रसार झालेला असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावनीसाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरलेली आहे.

प्रजासत्ताक दिनाचे शुभप्रसंगी
दि 26 जानेवारी 2025 ला,
मा पालकमंत्री श्री संजयजी सावकारे साहेब यांचे शुभहस्ते व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीमध्ये सदर पुस्तिकेचा विमोचन सोहळा पार पडलेला आहे.

या पुस्तिकेच्या 1000 प्रती शासकीय मुद्रनालाय नागपूर येथे तयार करून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, तलाठी, तसेच सर्व महसूल, भूमि अभिलेख व ग्रामविकास विभागाचे संबंधित अधिकारी – कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

        बोध वाक्य — “ स्वामित्वाचे रक्षण व भूमि अभिलेखाचे जतन

शासन निर्णय

 १. आस्था व लेखा
२. भूमापन  विभाग
३. नगर भूमापन
४. स्वामित्व व e-PCIS
५ .एकत्रीकरण व पुनर् मोजणी

9