बंद

घनकचरा व्यवस्थापन नियम

वाचा : १. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६
२. मा. सर्वोच्च न्यायालयातील नागरी अपील क्र.६१७४/२०२३ मधील आदेश दि. ०५/०५/२०२६ व दि.१९/०२/२०२६

: आदेश :

ज्याअर्थी, नागरी क्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची अनिवार्य अंमलबजावणी सुनिश्चित करणेकरिता मा. सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त वाचा क्र.२ नुसार सविस्तर आदेश दिले आहेत. ज्यामधील मुद्दा क्र. ४, ५, ६ व ७ मध्ये नमूद केल्यानुसार तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे.
                त्याअर्थी, भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची काटेकोर अंमलबजावणी करणेसाठी खालीलप्रमाणे समर्पित “विशेष कक्ष” स्थापन करण्यात येत आहे.

अनु. क्र. नियुक्त अधिकारी पदनाम
1 जिल्हाधिकारी, भंडारा अध्यक्ष
2 जिल्हा सह आयुक्त, नपप्र सदस्य सचिव
3 उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भंडारा सदस्य
4 मुख्याधिकारी, नगरपरिषद, भंडारा सदस्य
5 मुख्याधिकारी, नगरपरिषद, तुमसर सदस्य
6 मुख्याधिकारी, नगरपरिषद, साकोली सदस्य
7 मुख्याधिकारी, नगरपंचायत, पवनी सदस्य
8 मुख्याधिकारी, नगरपंचायत, लाखनी सदस्य
9 मुख्याधिकारी, नगरपंचायत, लाखांदूर सदस्य
10 मुख्याधिकारी, नगरपंचायत, मोहाडी सदस्य
11 मुख्य अभियंता, भंडारा परिमंडल, भंडारा, म.रा.वि.वि.कं.लि, भंडारा सदस्य
12 कार्यकारी अभियंता, म.जी.प्रा. गोंदिया सदस्य

उपरोक्त विशेष कक्षाद्वारे पार पाडावयाचे कर्तव्यः

  • नागरी क्षेत्रामध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची अनिवार्य अंमलबजावणी होत असल्याची खात्री करणे.
  • संबंधित कार्यकारी अभियंता, म.जी.प्रा. गोंदिया किंवा ज्या नागरी क्षेत्रात पाणीपुरवठा नगरपरिषद/ नगरपंचायती मार्फत होतो त्यांचे मुख्याधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ च्या अंमलबजावणी न करणाऱ्या “Bulk waste Generators” चा पाणीपुरवठा खंडित करणेची कार्यवाही करणे.
  • मुख्य अभियंता, भंडारा परिमंडल, भंडारा, म.रा.वि.वि.कं.लि, भंडारा यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ च्या अंमलबजावणी न करणाऱ्या “Bulk waste Generators” चा विद्युत पुरवठा खंडित करणेची कार्यवाही करणे.
  • उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भंडारा यांनी जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात भेटी देऊन भेटीदरम्यान आढळून येणारे अधिकृत तसेच अनधिकृत dump yards/ sites यांचे छायाचित्रे घेऊन पुढील कार्यवाही तसेच अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना पाठविणे.
  • जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिकृत केलेल्या वाहनाद्वारे घनकचऱ्याची वाहतूक व विल्हेवाट योग्य रित्या केली जात असल्याबाबतची खात्री करावी. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ नियमनच नाही, तर रस्त्यांच्या कडेला, रेल्वे रुळांवर, तलावांच्या काठावर, डोंगराच्या पायथ्याशी इत्यादी ठिकाणी होणारे अनधिकृत कचरा टाकण्याचे प्रकार रोखणेही शक्य होईल.

जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या अंमलबजावणीच्या कामगिरीचा/प्रगतीचा संक्षिप्त सारांश महिन्यातून एकदा तयार करून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने मा. नगरविकास सचिवांना सादर करावा.