बंद

जिल्हा परिषद भंडारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालय

जिल्हा परिषद भंडारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालय
कार्यालयाचे नांव जिल्हा परिषद भंडारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालय
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप अनुदानित, विनानुदानित आणि स्वयं अर्थ सहायीत शाळामध्ये शिक्षण आणि महाराष्ट्र खाजगी माध्यमिक शाळा नियमावली १९८१ च्या अंमलबजावणी बाबत पर्यवेक्षण आणि सनियंत्रण करणे.
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा अ) लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत १४ सेवा
१) राज्याबाहेर शिक्षण घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रतीस्वक्षरी देणे.
२) विद्यार्थ्यांचे जात, जन्म तारीख, नाव, इत्यादी मध्ये बदलास मान्यता देणे.
३) माध्यमिक शाळासाठी राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान वितरण
४) उच्च माध्यमिक शाळासाठी राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान वितरण
५) विद्यार्थ्यांच्या इयत्ता १० वी गुणपत्रिकेतील जन्म दिनांक, नाव, वर्णलेखनातील दुरुस्तीस शिफारस करणे.
६) खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे रुपये ३ लक्ष मर्यादेतील वैद्यकीय प्रतिपूर्ती मंजुरी.
७) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वैयक्तिक मान्यता देणे.
८) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पदोन्नतीस मान्यता देणे.
९) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वरिष्ट श्रेणी आणि निवड श्रेणी प्रकरणांना मान्यता देणे.
१०) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विनानुदानीत वरून अनुदानित पदावर बदलीस मान्यता देणे.
११) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवा निवृत्तीचे इतर लाभ उदा. पेन्शन व सेवा निवृत्ती उपदान.
१२) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करणे.
१३) खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बदलीस मान्यता देणे.
१४) माध्यमिक शाळा मधील प्रभारी मुख्याध्यापक मान्यता देणे.
ब) मानव विकास योजना अंतर्गत इयत्ता ८ ते १२ वर्गात शिकणाऱ्या मुलीना मोफत सायकल वाटप योजना रावविणे.
विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री संजय डोर्लीकर शिक्षणाधिकारी rmsabhandara1@gmail.com
श्री रवींद्र सलामे अधीक्षक आणि प्रभारी उप शिक्षणाधिकारी rmsabhandara1@gmail.com
फोटो गॅलरी
संकेतस्थळ
education.maharashtra.gov.in
mscepune.in
mahresult.nic.in
scholarships.gov.in
inspireawards-dst.gov.in