बंद

जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा

जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा
विभागाचे नाव जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा
विभागातील कामाचे वर्णन महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग तर्फे भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा देणे.
विभाग सेवा १ अतिदक्षता विभाग : शासनाने अतिदक्षता विभागासाठी जिल्हा / सामान्य रुग्णालयामध्ये अतिरिक्त कर्मचारी वर्गासह अतिदक्षता विभाग मंजूर केला आहे. या अतिदक्षता विभागांसाठी आवश्यक त्या उपकरणांची व्यवस्था केली आहे.
२ विशेष नवजात दक्षता विभाग : जन्मतःच कमी वजनाच्या व योग्यवेळे पूर्वी जन्म झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा व महिला रुग्णालयात १० अतिरिक्त कर्मचारी व रेडियंट वॉर्मर्स आणि फोटोथेरपी युनिट इत्यादि आवश्यक उपकरणासह विशेष नवजात दक्षता विभाग स्थापन केला आहे.
३ जळीत विभाग : भाजून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेगळा जळीत विभाग मंजूर आहे. या विभागासाठी ३ कर्मचारी ( २ वर्ग २च्या परिचारिका व एक चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी ) मंजूर आहेत. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी ५ खाटा आहेत.
४ सि.टी. स्कॅन : विविध रोगांच्या निदानासाठी सि.टी. स्कॅन करणे आवश्यक असते. सि.टी. स्कॅन सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.
५. मानसोपचार सेवा : १.३.२००६च्या शासकीय निर्णयानुसार जिल्हा रुग्णालयामध्ये मानसोपचार विभाग मंजूर आहे.
६ सोनोग्राफी सेवा : रोगांचे निदान योग्य रीतीने होण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
७ सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
8 तसेच इतर आरोग्य सुविधा भंडारा जिल्ह्यातील लोकांना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे देण्यात यस्ट आहेत.
विभागीय संपर्क
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क ईमेल पत्ता
डॉ. दिपचंद सोयाम जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा 07184-252247 cs_bhandara@rediffmail.com
डॉ. अतुल टेंभुऱ्णे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय भंडारा 07184-252247 csbhandara2019@gmail.com
फोटो गॅलरी
विभाग वेबसाइट
आरोग्य विभाग https://arogya.maharashtra.gov.in/
राष्ट्रीय आरोग्य अभियान https://nrhm.maharashtra.gov.in/
फेसबुक पेज लिंक https://www.facebook.com/p/District-hospital-Bhandara-100064828124164/