• साइटमॅप
  • Accessibility Links
बंद

जिल्ह्याविषयी

भंडारा हा ‘भनारा’ या शब्दाचा अपभ्रंश असावा कारण रतनपूर येथील उत्खनात इ.स.११०० मध्ये मिळालेला शिल्पलेखात ‘भनारा’ असा शब्दप्रयोग आढळतो. भंडारा जिल्हा हा वैनगंगेच्या खोऱ्यात उत्तर अक्षांश २१.१७° आणि पूर्व रेखांश ७९.६५° च्या दरम्यान वसलेला आहे. भंडारा जिल्ह्याचा उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा, पूर्वेस गोंदिया जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा व पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात दर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या ९८२ आहे. हेच प्रमाण ग्रामीण भागात ९८३ व शहरी भागात ९८१ आहे. तुमसर, लाखांदूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात जास्त ९९२ तर मोहाडी, लाखनी तालुक्यात सर्वात कमी ९७४ इतके आहे. या जिल्ह्यात ८३.८% लोक साक्षर आहेत. त्यापैकी पुरुष व स्त्रियांची टक्केवारी अनुक्रमे ९०.४ % व ७७.१ % इतकी आहे. नागरी भागात ९०.७ % व ग्रामीण भागात ८२.१ % साक्षरता दिसून येते. जिल्ह्यात धर्मानुसार हिंदू ८४.१%, बौद्ध १२.९%. मुस्लिम २.२%, खिश्चन ०.२%, जैन ०.१%, शीख ०.१%, इतर ०.३% आणि धर्म निर्देशित न केलेली लोकसंख्या ०.२% आहे. वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत. जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली असे 3 उपविभाग आहेत. भंडारा उपविभागात 2 तालुके असून , तुमसर उपविभागात 2 तालुके असून ,साकोली उपविभागात 3 तालुके असून 878 गावे आहेत.   अधिक वाचा …

बातम्या आणि अपडेट्स

तपशील पहा
Shri.Sanjay Savkare
संजय सुशिला वामन सावकारे मा.पालकमंत्री – भंडारा
जिल्हाधिकारी भंडारा
डॉ. संजय कोलते भा.प्र.से. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी भंडारा