बंद

एक जिल्हा एक उत्पादन

एक जिल्हा एक उत्पादन भंडारा जिल्हा
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत,‘उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग’ (DPIIT) ने स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागांना त्यांच्या पारंपारिक कौशल्यांचा वापर करून सक्षम करण्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम सुरू केला. जिल्‍हा स्‍तरावर शाश्‍वत उपजीविकेच्‍या संधी निर्माण करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हाकार्यक्रमाचा उद्देश आहे.

हा उपक्रम माननीय पंतप्रधानांच्या ‘देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्याच्या’ दूरदृष्टीचे प्रकटीकरण आहे. सर्व प्रदेशांमध्ये सर्वांगीण सामाजिकआणि आर्थिक वाढ करण्यासाठी ‘देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे’ ही कल्पना आहे. ODOP उपक्रमाच्या अंतर्गत निवडलेल्या प्रत्येक उत्पादनाशी संबंधित पुरवठा साखळीतील समस्या ओळखणे, समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे, निवडलेल्या उत्पादनांची बाजारपेठ सुलभता सुधारणे आणि पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी उत्पादकांना समर्पित हँडहोल्डिंगकरणे यांचा समावेश आहे. निवडलेल्या उत्पादनांचीसंपूर्ण यादी येथे मिळवा .

महाराष्ट्र ODOP प्रोत्साहन उपक्रमांचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमधून औद्योगिक आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असलेले एकूण 72 ODOPS ओळखण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत, भंडारा जिल्ह्यासाठी ओळखण्यात आलेली ODOP उत्पादने तांदूळ आणि खनिजे आहेत.

वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला भंडारा जिल्हा भाताच्या मोठ्या उत्पादनामुळे संपूर्ण महाराष्ट्र भर ओळखला जातो. चिन्नोर, दुभराज आणि कालिकम्मोड यांसारख्या सुगंध असलेल्या तांदळाच्या वाणांना देशभरात जास्त मागणी आहे. संपूर्ण जिल्ह्यात सर्वांगीण सामाजिक-आर्थिक वाढ सक्षम करण्यासाठीआणिभात लागवडीच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी जिल्ह्याने एक समर्पित कृती आराखडा तयार केला आहे.

भंडारा जिल्ह्याचा ODOP कृती आराखडा
• लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी स्थानिक माती आणि हवामानाचा विचार करून भाताच्या विविध जातींच्या विकासाला चालना देणे
• पेरणीपासून कापणीपर्यंत संपूर्ण लागवड पद्धतींचे प्रदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात ‘शेतीशाळा’ आयोजित करणे
• अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तांदूळ मूल्य साखळी सुधारण्यासाठी ‘राइस व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट वर्कशॉप्स’ आयोजित करणे
• सेंद्रिय तांदूळ उत्पादनासाठी क्लस्टर्स ओळखणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सेंद्रिय प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत करणे
• भंडारा जिल्ह्यातील तांदूळ आणि तांदूळ उत्पादनांचे डिझाईन, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी स्थानिक R&D आणि व्यवस्थापन संस्थांशी टाय-अपकरणे
• बाजारामध्ये सुलभता आणण्यासाठीखरेदीदार-विक्रेते परिषद, निर्यात परिषद, कृषी महोत्सव, फॉरेक्स ग्राहक मेळावा इत्यादी कार्यक्रम आयोजित करणे
• तांदूळ आणि तांदूळ उत्पादनांच्या ऑनलाइन मार्केटिंगला प्रोत्साहन देणे

ODOP सेल- भंडारा साठी समर्पित प्रमुख सदस्यांचे संक्षिप्त वर्णन
नाव पद संपर्क क्र.
मा . योगेश कुंभेजकार जिल्हाधिकारी 7184254777
श्री बी.एम. बदर महाव्यवस्थापक, DIC 9422812549
सौ.संगिता माने डी एस ए ओ 7755910740
श्री.निलेश साळुंखे डी पी एम 7744800954
सौ.शैलजा वाघ डी आई ओ 8381001097
श्री कुणाल गोंडचवार व्यवस्थापक, DIC 8483091809
मिस. मिनाक्षी बागडे EY,सल्लागार 7972692098
नोडल ऑफिसर तपशील आणि हेल्पलाइन नंबर
जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा
पद: महाव्यवस्थापक
संपर्क क्रमांक : 09422812549
ईमेल आयडी: didic.bhandara@gmail.com
हेल्पलाइन क्रमांक:
०७१८४२५१५८२
(सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत सक्रिय; सरकारी सुटी वगळता सोमवार ते शुक्रवार)
मार्गदर्शकांची यादी
नाव पद संपर्क क्र.
श्री.पंकज सारडा अध्यक्ष, भंडारा मेटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
श्री.हर्षवर्धन हरडे संचालक, भंडारा राईस मिल क्लस्टर प्रा. लि.
श्री. प्रतिक गजबिये डीजीएफटी, नागपूर
संस्थात्मक सहाय्य प्रदान करणाऱ्या विभागांचे तपशील
विभाग संपर्क पत्ता
जिल्हा उद्योग केंद्र 07184-251582 आरटीओ कार्यालयाजवळ, भंडारा 441904
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय 07184- 252393 बँक ऑफ बडोदाच्या बाजूला, राजीव गांधी चौक, भंडारा 441904
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (ATMA) 07184-251266 बँक ऑफ बडोदा जवळ, एचपी गॅस गोदामाच्या मागे, राजीव गांधी चौक, भंडारा 441904
कृषी विज्ञान केंद्र (KVK) 07186- 295018 कृषी विज्ञान केंद्र साकोली, लाखांदूर रोड, तहसील साकोली, जिल्हा भंडारा पिन-441802

ओडीओपी उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येणारे उपक्रम