बंद

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
विभागाचे नाव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
विभागातील कामाचे वर्णन
  • सेवायोजन कार्ड वेबपोर्टलवर नांव नोंदणी व नोकरीस सहकार्य
  • रोजगार मेळावे
  • अल्प मुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण
  • रोजगार प्रोत्साहन योजना
  • व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन
  • सेवा-सोसायटी नोंदणी करणे
  • करियर ग्रंथालयसदृष्य अभ्यासिका
  • उद्योजकता विषयक नाविन्यता उपक्रम
विभाग सेवा
  • सेवायोजन कार्ड वेबपोर्टलवर नांव नोंदणी व नोकरीस सहकार्य :-
शासकीय व निमशासकीय आस्थापनेवर नोकरी प्राप्त करण्याकरीताया विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in द्वारे राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवार ऑनलाईन नांव नोंदणी करू शकतात, तसेच याच पोर्टलद्वारे उद्योजक त्यांचेकडील रिक्तपदाची मागणी ऑनलाईन नोंदवून स्वतःच पात्र उमेदवार ची यादी प्राप्त करून घेऊ शकतात. उमेदवार सेवायोजन ऑनलाईन नोंदणी द्वारे प्राप्त झालेल्या युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन अप्लाय करुन नोकरी प्राप्त करु शकतात.
  • रोजगार मेळावे :-
रोजगाराची संधी शोधणाऱ्या आणि उमेदवारांच्या शोधात असणाऱ्या उद्योजकासाठी एक हक्काचे व्यासपीठ रोजगार मेळाव्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात येते. पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा मार्फत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकरीच्या संधी वेबसाईटवर उपलब्ध असतात. रोजगार मेळावे आयोजित केल्यामुळे उमेदवार व उद्योजक एका छताखाली आल्यामुळे वेळ, पैसा व प्रवासाचे श्रम वाचतात, उद्योजकांना पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध होते. या वेबसाईट https://rojgar.mahaswayam.gov.in वर नियमीत विविध कंपन्या आपल्याकडील रिक्त पदाची माहिती उपलब्ध करुन देत असतात. उमेदवारांनीसेवायोजन कार्ड चे युजर आडी व पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन अप्लाय करणे व विविध कंपन्याद्वारे आयोजीत मुलाखतीस उपस्थित राहून आपली नोकरी प्राप्त करुन घेवू शकतात.
  • अल्प मुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण :-
जिल्हयातील युवक/युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घ्यावयाचे असल्यास प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येते. कौशल्य विकासासंबंधी प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम राबविताना स्थानिक उद्योजकांच्या गरजा लक्षात घेवून उद्योजकांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येते. याबाबतची संपूर्ण माहिती वेबसाईटhttps://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केंद्र व राज्य शासनाचे अल्प मुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण राबवावयाचे असल्यास प्रशिक्षण केंद्र स्कील इंडीया पोर्टलवर (https://skillindia.gov.in) नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा.
  • रोजगार प्रोत्साहन योजना :-
केंद्रीय नियोजन मंडळाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुशिक्षितांची बेरोजगारी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे. विविध व्यवसायांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांचे कसब व पात्रता वाढवून त्यांना नियमित रोजगार उपलब्ध करून देणे अथवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे स्वयंरोजगार सुरु करणे शक्य व्हावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असून शासनातर्फे या कालावधीसाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा 300 रुपयांपासून 1,००० रुपयापर्यंत प्रत्यक्ष कंपनीमध्ये रुजू झालेल्या उमेदवारांना कंपनीद्वारे सहा महिन्यापर्यंत विद्यावेतन देण्यात येते.
  • व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन :-
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र एक व्यवसाय मार्गदर्शन केंद्र असून या सेवेचे मुख्य कार्य म्हणजे तरुणांना त्यांच्या आवडी, कल. आकांक्षा आणि शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ते ज्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त पात्र असतील त्या व्यवसायात पदार्पण करण्याचे त्यांना मार्गदर्शन करणे होय. त्याशिवाय युवकांच्या व्यावसायिक समस्या जाणून घेऊन त्यांची उकल करण्यास साहाय्य करण्याचे व आवडीच्या व्यवसायातील प्रौढ उमेदवारांना इतर व्यवसाय मिळवून देण्याचे साहाय्य करण्याचे कार्य या सेवेच्या अंतर्गत केले जाते.
  • सेवा-सोसायटी नोंदणी करणे :-
सेवायोजन केंद्रात नोंदणी करण्याची बेरोजगार तरुणांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. परंतु बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी त्या प्रमाणात कमी होत आहे. सध्या ही भेडसावणारी समस्या काही प्रमाणात कमी करण्यासाठी बेरोजगारांच्या सेवा सोसायट्या यांच्यामार्फतग्रामीण तसेच शहरी जनतेला आणि विविध शासकीय विभागांना दैनंदिन गरजेच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेरोजगारांच्या सेवा सोसायट्या सहकार विभागाच्या सहकार्याने नोंदणी करणेकरीता नवीन प्रस्ताव सादर करणे.
  • करियर ग्रंथालयसदृष्य अभ्यासिका :-
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात रोजगाराच्या संधीचे स्वरूप बदलले आहे. रोजगाराच्या नवनवीन संधीबाबत माहिती नसल्याने तथा त्यास अनुसरून पात्रता धारण करीत नसल्याने मोठया संख्ये़ने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार हे माहिती व मार्गदर्शनाअभावी रोजगारापासून वंचीत राहत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधीची माहिती व मार्गदर्शन बेरोजगार उमेदवारांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन करियर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना सुरू करण्यात झाली. याअंतर्गत ग्रंथालयसदृश अभ्यासिका सुरू करून यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, मासिके, करियर मार्गदर्शनावरील पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध आहे.
  • उद्योजकता विषयक नाविन्यता उपक्रम :-
जिल्हयातील युवक युवतींना उद्योग उभारणीस चालना मिळणेकरीता व त्यांच्या नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याकरीता उद्योजकता विषयक नाविन्यता उपक्रम राबविण्यात येतो. अधिक माहिती करीता www.msins.inया संकेतस्थळावर भेट द्यावी.
विभागीय संपर्क
अधिकाऱ्याचे नाव पदनाम संपर्क ईमेल पत्ता
श्री.सु.रा.झळके सहायक आयुक्त 07184-252250 bhandararojgar@gmail.com
श्री.सोनु शं.उके जिल्हा कौशल्य विकास समन्वयक 07184-252250 bhandararojgar@gmail.com
फोटो गॅलरी
विभाग वेबसाइट
निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सन 2023-24 निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सन 2023-24
महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज बाबत महाराष्ट्र स्टुडन्ट इनोवेशन चॅलेंज बाबत
Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation www.mahaswayam.gov.in
Rojgar Portal www.rojgar.mahaswayam.gov.in
Maharashtra State Skill Development Society www.kaushalya.mahaswayam.gov.in
Skill India Portal www.skillindia.gov.in
Maharashtra State Innovation Society www.msins.in
संपर्कासाठी पत्ता :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल, बस स्टॅन्ड जवळ भंडारा -441904
विभागाच्या नवीन उपक्रम/योजना Free Skill Development Training 2023-24
विभागाच्या नवीन उपक्रम/योजना Regarding Student Innovation Challenge