बंद

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
कार्यालयाचे नांव ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद भंडारा
कार्यालयीन कामकाजाचे स्वरुप ग्रामीण भागासाठी नळ पाणी पुरवठा योजना तयार करणे
कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना नळ जोडणीद्वारे शुध्द पिण्याचे पाणी पुरविणे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत मुख्यत्वे जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
राज्यात जल जीवन मिशन राबविण्यासाठी दिनांक 04.09.2020 महाराष्ट्र शासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” प्रमाणे पाणी पुरवठा करावयाच्या आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

जल मिशनसाठी विहित कालावधीत उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी चार स्तरीय संस्थात्मक संरचना तयार करण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे आहे.
1)राष्ट्रीय स्तरावर “राष्ट्रीय जल जीवन मिशन”(NJJM)
2)राज्य स्तरावर “राज्य पाणी व स्वच्छता मिशन” (SWSM)
3)जिल्हा स्तरावर “जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन” (DWSM)
4)ग्राम पातळीवर ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती (VWSC)

जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समिती
1) जिल्हाधिकारी :- अध्यक्ष
2) मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) :- सह अध्यक्ष
3) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) :- प्रकल्प संचालक
4) कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.जि.प) :- सदस्य सचिव
5) कार्यकारी अभियंता (म.जी.प्रा. विभाग) :- सदस्य
6) वरिष्ठ भूवैज्ञानिक (भू.स.वि.यं.) :- सदस्य
7) वभागीय वन अधिकारी :- सदस्य
8) प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास संस्था/कार्यक्रम) :- सदस्य
9) जिल्हा आरोग्य अधिकारी (जि.प.) :- सदस्य
10) शिक्षण अधिकारी (प्राथमिक, जि.प) :- सदस्य
11) कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग) :- सदस्य
12) कार्यकारी अभियंता (जलसंधारण विभाग) :- सदस्य
13) जिल्हा कृषी अधिकारी (जि.प.) :- सदस्य
14) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी :- सदस्य
15) जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी :- सदस्य
16) कार्यकारी अभियंता ( ल.पा. जि.प.) :- सदस्य
17) कार्यकारी अभियंता (सा.बा.विभाग भंडारा) :- सदस्य
सन्माननीय मानद सदस्य खालीलप्रमाणे
1) मा. श्री. प्रफुल्लजी पटेल, राज्यसभा सदस्य :- मानद सदस्य
2) मा. श्री. सुनिलजी मेंढे, लोकसभा सदस्य (भंडारा-गोंदिया) :- मानद सदस्य
3) मा. आ. अभिजीतजी वंजारी,विधानपरिषद सदस्य
(पदवीधर मतदार संघ) :- मानद सदस्य
4) मा. आ. सुधाकरजी, आडबले विधानपरिषद सदस्य:- मानद सदस्य(शिक्षक मतदार संघ)
5) मा. श्री. नानाभाऊ पटोले, विधानसभा सदस्य (साकोली) :- मानद सदस्य
6) मा. आ. श्री. नरेंद्रजी भोंडेकर, विधानसभा सदस्य (भंडारा) :- मानद सदस्य
7) मा. आ. श्री. राजूभाऊ कारेमोरे, विधानसभा सदस्य (तुमसर) :- मानद सदस्य
8) मा. आ.श्री. परिणयजी फुके, विधानपरिषद सदस्य :- मानद सदस्य

जल जीवन मिशन अंतर्गत कामाची रुपरेषा
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्वप्रथम जिल्हयातील सर्व गावांचा आराखडा तयार करण्यात आला व मा. पालकमंत्री यांचे स्वाक्षरीनिशी शासनास सादर करण्यात आला. तद्नंतर आराखडयात समाविष्ट सर्व गावांचे अंदाजपत्रके तयार करुन त्यास विविध स्तरावर तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. रु. 15 लक्ष पेक्षा कमी किंमतीस ग्रामपंचायत स्तरावर प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. रु. 15 लक्ष वरील व रु. 5.00 कोटी पर्यंत किंमतीस जिल्हा पाणी स्वच्छता मिशन समिती स्तरावर प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. तद्नंतर नियमाप्रमाणे निविदा कार्यवाही करुन योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

महत्वाचे शासन निर्णय
6) जल जीवन मिशन अंतर्गत गाव ” हर घर जल” घोषित करण्याबातची कार्यपध्दती दि. 06.07.2023
विभागाचे संपर्क क्रं.
अधिकाऱ्याचे नांव पदनाम संपर्क क्रं. ईमेल आय डी
श्री. व्ही. एम. देशमुख कार्यकारी अभियंता —– eebnbhandara@rediffmail.com
सौ. व्ही. व्ही. कर्णेवार उप कार्यकारी अभियंता —– eebnbhandara@rediffmail.com
श्री. एच. व्ही. बनसोड उपविभागीय अभियंता ग्रा.पा.पु. उपविभाग भंडारा —– rwssdn.zpbhandara@gmail.com
श्री. एच. आर. खोब्रागडे उपविभागीय अभियंता ग्रा.पा.पु. उपविभाग मोहाडी —– sderwsmohadi@gmail.com
श्री. ओ. एल. बोंद्रे उपविभागीय अधिकारी, ग्रा.पा.पु. उपविभाग तुमसर —- sderwstumsar@gmail.com
श्री. एस. डी. मारबदे उपविभागीय अधिकारी, ग्रा.पा.पु. उपविभाग तुमसर —- sderwslakhandur@gmail.com
कु. एन. एस. हलमारे उपविभागीय अभियंता, (प्रभारी) ग्रा.पा.पु. उपविभाग लाखनी —- rwssdlakhani@gmail.com
श्री. डी. डी. ढवळे उपविभागीय अभियंता, (प्रभारी) ग्रा.पा.पु. उपविभाग पवनी —- sderwssub.pauni@rediffmail.com
श्री. एच. ए. गणवीर उपविभागीय अभियंता, (प्रभारी) ग्रा.पा.पु. उपविभाग साकोली —– sderwsub.sakoli@rediffmail.com
श्री. एस.पी. कुरंजेकर उपअभियंता (यां), (प्रभारी) ग्रा.पा.पु. यांत्रिकी उपविभाग भंडारा —– de.bhandara.1@gmail.com
श्री. एस.पी. कुरंजेकर उपअभियंता (यां), (प्रभारी) ग्रा.पा.पु. देखभाल दुरुस्ती उपविभाग भंडारा —– de.bhandara.1@gmail.com
फोटो गॅलरी

पुरवठा विहिर मौजा टवेपार ता. भंडारा

रिचार्ज शाफट –रिचार्ज पिट मौजा धारगाव ता. भंडारा

मौजा चान्ना ता. लाखनी

रिचार्ज शाफट मौजा निमगाव ता.लाखनी

मौजा नैनपूर ता. साकोली

मौजा मुंडीपार ता. साकोली

स्विच रूम मौजा वडेगाव ता. मोहाडी

मौजा विरली (खं.) ता. पवनी

सौर उर्जेवर आधारीत दुहेरी पंप न.पा.पु.यो. मौजा कन्हाळमोह ग्रा.पं. धारगाव ता. भंडारा

गावातील शेवटच्या टोकाचे कार्यात्म्क नळ जोडणी (FHTC)

ग्रा.पं गुंथारा ता. भंडारा येथे हर घर जल घोषित करणेबाबत आयोजित ग्रामसभा

ग्रा.पं. गुंथारा ता. भंडारा येथील ग्रामस्थ हात उंचावून गाव हर घर जल घोषित झाल्याबाबत अनुमोदन करतांना

संकेतस्थळ
https://ejalshakti.gov.in
J36 फॉरमॅट- घरगुती टॅप कनेक्शनची मासिक प्रगती
https://ejalshakti.gov.in/JJM/JJMReports/Physical/JJMRep_HouseholdTapWaterConnection.aspx
Details of Har Ghar Jal (100 % FHTC Coverage) https://ejalshakti.gov.in/JJM/JJMReports/Physical/JJMRep_HarGharJalVillage.aspx